गतवर्षात १ कोटी नागरिकांनी सोडली गॅस सब्सिडी

subsidi
गेल्या वर्षात १ कोटीहून अधिक गॅस ग्राहकांनी गॅस सब्सिडी सोडली असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयातील अधिकार्‍यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींनी सक्षम गॅस ग्राहकांनी गॅस सब्सिडी सोडण्याचे आवाहन गतवर्षी केले होते त्यानुसार मार्च अखेर १०००६३०३ ग्राहकांनी सब्सिडी सोडली असल्याचे हे अधिकारी म्हणाले. यामुळे सरकारी खजिन्यात कांही कोटींची भर पडणार आहे.

सध्याच्या योजनेनुसार गॅस ग्राहक वर्षाला १४.२ किलोचे १२ किंवा ५ किलो वजनाचे ३४ सिलेंडर सब्सिडीवर घेऊ शकतो. दिल्लीत या सिलींडरचा भाव अनुक्रमे ४१९.१३ व १५५ रूपये आहे. बाजारभावाप्रमाणे १४.२ किलोच्या सिलींडरची किंमत ५०९.५० रूपये आहे. गतवर्षी सब्सिडीवर सरकारचे ३० हजार कोटी रूपये खर्च झाले आहेत. ग्राहक सब्सिडी सोडण्यासाठी थेट वितरकाकडे लेखी अर्ज करू शकतात अथवा माय हेल्प डॉट इनवर इलेक्ट्राॅनिक पद्धतीनेही सब्सिडी सोडू शकतात.

Leave a Comment