‘युरेका नोट’ स्मार्टफोन लॉन्च !

eureka
मुंबई : ‘मायक्रोमॅक्स टेलीवेंचर’ कंपनीने नुकताच ६ इंचाचा ‘युरेका नोट’ हा स्मार्टफोन लॉन्च केला असून युरेकाचे हे पहिल प्रोडक्ट आहे जे सर्व मोबाईल स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल. याआधी या कंपनीने आपल्या सर्व स्मार्टफोनची विक्री ही फक्त ऑनलाइनच केली आहे.

कसा आहे ‘युरेका नोट’ – युरेका नोटचा डिस्प्ले ६ इंच फूल एचडी, तसेच १९२० X १०८० पिक्सलचा असून ३ कोटींग असलेली गोरीला ग्लास देण्यात आली आहे. यात अँन्ड्रॉईड ५.१.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम, ४जी, एलटीई, वाईफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि मायक्रो-यूएसबी अशा कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आल्या आहेत. यात १.५ गीगाहर्टस ऑक्टा-कोर मीडियाटेक एमटी ६७५३ प्रोसेसर आणि ३ जीबी रॅम देण्यात आले आहेत. याची इंटरनल स्टोरेज क्षमता १६ जीबी, मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट देखील आहे. यात एलईडी फ्लॅश बरोबर १३ मेगपिक्सल रिअर कॅमेरा आणि एफ/२.२ अपर्चरसोबत ५ मेगपिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन फिंगरप्रिट सेंसरद्वारे अर्ध्या सेकंद पेक्षा कमी वेळेत अनलॉक करु शकतो, असे कंपनीचे म्हणणे आहे आणि मुख्य म्हणजे या स्मार्टफोनची किंमत केवळ १३,४९९ रुपये एवढी आहे.

Leave a Comment