आली पाण्यावर चालणारी कार

water1
भोपाळ : चक्क पाण्यावर चालणारी कार मध्य प्रदेशमधील एका अवलियाने बनविली असून या अवलिया मॅकेनिकचे नाव रईस मकरानी असे आहे. तो सागर जिल्ह्यात राहतो.

रईस मकरानी या मॅकेनिकने याचे पेटंट देखील घेतले आहे. या कारमध्ये चार जण बसू शकतात. त्याच्या या तंत्रज्ञानाला मागणीही वाढली आहे. त्याला यासाठी चीनमधून मागणीही आली आहे. चीनमधील सियाग शहरात इलेक्ट्रिक वाहन तयार करणारी कंपनी कोलियोच्या महाव्यवस्थापक सुमलसन यांनी रईसच्या तंत्रज्ञानाचे कौतुक करत कंपनीबरोबर काम करण्याचा प्रस्तावही ठेवला आहे. दरम्यान, रईसने ही ऑफर धुडकावून लावली आहे. कारण त्याला चीनमध्येमध्येच कार बनविण्याची अट घालण्यात आली होती. आपण माझ्या देशात म्हणजेच भारतात कार बनविणार आणि बाजारात उतरवणार असल्याचे रईसने म्हटले आहे. जर चीन कंपनीबरोबर त्याने ही कार बनविण्याचा विचार केला तर लवकरच ही कार रस्त्यावर धावताना दिसेल.

रईसच्या म्हणण्यानुसार या तंत्रज्ञानाचा वापर करुन अॅसिटिलीन गॅसचा प्रयोग होतो. या गॅसचा उपयोग इंडस्ट्रीजमध्ये वेल्डींग आणि पोर्टेबल लायटिंगसाठी केला जातो. मात्र, रईस याचा प्रयोग कारचे इंजन चालविण्यासाठी करतो. रईस गेली १५ वर्षे मॅकेनिकचे काम करीत आहे. रईस कधी शाळेत गेलेला नाही आणि कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. ही कार २० लीटर पाण्यावर २० किमी अंतर धावते. २० लीटर पाण्याच्यामाध्यमातून २ किलो कॅल्शिअम कार्बाईडचे मिश्रण होऊन यांच्यातून होणाऱ्या इंधनातून ही कार २० किलोमीटर मीटर चालते.

Leave a Comment