१४ तारखेपासून उघडणार सराफा बाजार

gold
मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून बंद असलेली सोन्याची दुकाने उघडण्याला अखेर मुहुर्त सापडला असून सराफा दुकाने येत्या १४ एप्रिलपासून उघडण्याचा निर्णय महाराष्ट्र सराफ असोसिएशनने घेतला आहे. साधारणपणे ४० दिवसांपासून सराफाची दुकाने बंद असल्यामुळे ग्राहक आणि कारागिर त्रस्त झाले होते.

एक वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ऎन लग्नाच्या सीझनमध्ये सोन्याची दुकाने बंद असल्याने ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. पण आता ही दुकाने उघडणार असल्याने अनेकांना दिलासा मिळणार आहे. लोकांची मागणी लक्षात घेता दुकाने सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र सराफ असोसिएशनने घेतला आहे. सराफा दुकाने पुन्हा खुली होण्याच्या निर्णयामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने एक टक्का अबकारी कर मागे घ्यावा, या मागणीसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून सराफांचा संप सुरु होता. दरम्यान, प्रस्ताव मंजूर न झाल्यास २४ तारखेपासून पुन्हा दुकाने बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Comment