तेराशे कर्मचा-यांना नारळ देणार नोकिया

nokia
नवी दिल्ली – २०१८ पर्यंत फिनलँडमधील जवळपास १३०० कर्मचा-यांना फिनलँडची मोबाईल हँडसेट निर्माता कंपनी नोकिया नोकरीवरुन काढू इच्छित असल्याची माहिती कंपनीने दिली. नोकियाने प्रसिध्द केलेल्या एका निवेदनामध्ये म्हटले की या बाबतची चर्चा ते सुरु करणार आहेत. कंपनीच्या कर्मचा-यांची संख्या २०१५ च्या शेवटी फिनलँडमध्ये ६,७०० होती.

कंपनीने म्हटले की कर्मचा-यांची कपात मुख्यत: संशोधन आणि विकास, क्षेत्रीय विक्री संघटना आणि कॉरपोरेट संचालन सारख्या क्षेत्रात असेल.नोकियाने पूर्ण जगातील आपल्या किती कर्मचा-यांना नोकरीवरुन काढणार या बाबतची स्पष्ट माहिती दिली नाही. या कपातीचा संबंध अल्काटेल-लुसेंटच्या अधिग्रहणाच्या घोषणेनंतर कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी हे पाउल उचले आहे.

नोकियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव सूरीनी म्हटले की नोकियाने अल्काटेल-लुसेंटचे अधिग्रहणाच्या घोषणे दरम्यान आपल्या खर्च कमी करुन ९० कोटी यूरो (१.०३ अब्ज डॉलर) ने कमी करण्याची घेंषणा केली.नोकियाने जानेवारी २०१६ मध्ये आपल्या फ्राँसीसी अमेरिकी भागेदारी कंपनी अल्काटेल-लुसेंटचे अधिग्रहण संबंधीचा करार पूर्ण केला आहे.

Leave a Comment