आता अॅपवर मिळावा आधार कार्ड

aadhar
नवी दिल्ली : युनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने आधार अॅप लॉन्च केले असून या अॅपच्या मदतीने आधार कार्डबाबत अधिक माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकाल. आपल्या आधार कार्डचे डिटेल्स तुम्ही मोबाईलवर सेव्ह करु शकाल. त्यामुळे ई-केवायसी करण्याबरोबर दुसरी कामे तुम्ही सहज करु शकाल. त्यासाठी आधार जरुरी नसेल.

आपल्या स्मार्टफोनमधील गूगल प्ले स्टोरमध्ये ‘आधार मोबाईल’ टाईप करा आणि सर्च करा. डेस्कटॉपवर https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.maadhaarplus यावर क्लिक करा. त्यानंतर आधार कार्ड अॅपला आपल्या मोबाईलवर इंस्टॉल करा. अॅप इंस्टॉल केल्यानंतर आपला आधार नंबर, नाव आणि पिनकोड डिटेल्स भरा. डिटेल्स भरल्यानंतर आपण व्हेरीफिकेशन करावे लागेल. यासाठी अॅपकडून आपल्याला एक एसएमएस आधार सर्व्हरवरुन पाठवला जाईल. डिटेल्स व्हेरीफिकेशन झाल्यानंतर आपला फोटो सहित सर्व डिटेल्स मिळतील.

1 thought on “आता अॅपवर मिळावा आधार कार्ड”

Leave a Comment