भारतात दाखल झाली रेंज रोव्हर इव्होक कन्वर्टेबल

range-rover
नवी दिल्ली : सुप्रसिद्ध रेंज रोव्हर या कंपनीने आपली एसयुवी इव्होक कन्वर्टेबल ही चार चाकी लग्जरी कार भारतात दाखल केली आहे. मात्र, ही कार अद्याप विक्रीसाठी उपलब्ध झालेली नाही.

या गाड्या भारतात प्रदर्शनासाठी आणण्यात आलेल्या असून या गाडय़ा केशरी आणि काळ्या रंगाच्या आहेत. याचे पेट्रोल इंजिन ९स्पीड ऑटोमॅटिक ट्रांन्समिशनसोबत २३७ बीएचपी आणि ३४० एनएम टार्क निर्माण करणारे असून यामध्ये दोन प्रकारचे इंजिन आहेत. एक २.० लीटर टीडी ४ डीजल इंजिन, १४८ बीएचपी आणि दुसरी ३८० एनएमचे टार्क १७८ बीएचपी टीडी ४ असून, त्याचे इंजित ४३० एनएमचे टार्क निर्माण करणारी आहे. हे दोन्ही इंजिन ९ स्पीड आणि ६ स्पीड ऑटोमॅटीक ऑइल बर्नरचे आहे. कंपनीने अद्याप या गाडीच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही.

Leave a Comment