कट्टर विरोधकाचे मोदी फॉलोअर्स

modi
नवी दिल्ली – आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचादेखील दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ट्विटरवर फॉलो करणा-यांमध्ये समावेश झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फारकत घेणा-या अरविंद केजरीवाल यांनी मोदींना ट्विटरवरुन होळीच्या शुभेच्छा देत फॉलो केल्याबद्द्ल धन्यवाद मानले. तसेच भविष्यात एकमेकाला दिल्ली आणि केंद्र सरकार सहकार्य करुन काम करतील अशी आशाही व्यक्त केली.

७ लाख फॉलोअर्स अरविंद केजरीवाल यांचे ट्विटरवर आहेत. सर्वात जास्त फॉलो केले जाणा-या राजकारणा-यांमध्ये त्यांचा दुसरा क्रमांक आहे. तर २० लाख फॉलोअर्ससहित पहिल्या क्रमांकावर असणा-या अमिताभ बच्चन यांच्यानंतर भारतात सर्वात जास्त फॉलो केले जाणा-यांमध्ये मोदींचा दुसरा क्रमांक लागतो. मोदींचे ट्विटरवर १८ लाख फॉलोअर्स आहेत तर मोदी स्वत: १४०० जणांना फॉलो करतात. जगभरातील राजकारण्यांबद्दल बोलायला गेले तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर मोदींचा दुसरा क्रमांक लागतो.

Leave a Comment