शाओमीने आणला अँड्रॉईडवरील एमआय टीव्ही

xiaomi
मुंबई : अँड्रॉईडवर चालणारा एमआय टीव्ही ३ एस चायनीज मोबाईल उत्पादक कंपनी शाओमीने सादर केला आहे. हा टीव्ही ६५ इंच आणि ४३ इंच या दोन आकारांमध्ये उपलब्ध असून शाओमीने मोबाईल बाजारपेठेनंतर इतर गृहोपयोगी वस्तूंकडेही आपला मोर्चा वळवला आहे.

शाओमीने उच्च दर्जाचे टीव्ही ३ एस या मालिकेतले दोन टीव्ही सादर केले आहेत. दोन्ही टीव्हींची बॉडी मेटलयुक्त असून अवघ्या ५.९ मिलीमीटर जाडीचे आहेत. ६५ इंची टीव्हीची किंमत ८९९९ येन म्हणजे अंदाजे ८२ हजार ५०० रुपयांना आहे. तर ४३ इंचाच्या टीव्हीची किंमत 1799 येन म्हणजे अंदाजे १८ हजार ५०० रुपये इतकी आहे. सध्या हे टीव्ही चीनमध्ये उपलब्ध असले तरी लवकरच भारतातही मिळणार आहेत. एमआय टीव्ही ३ एस ६५ इंचांच्या मॉडेलमध्ये 2 जीबी रॅम असून इनबिल्ट स्टोरेज ८ जीबी इतका आहे. या मॉडेलसोबत टीव्ही बार मोफत देण्यात येईल. यामुळे चांगल्या दर्जाचा आवाज ऐकता येईल.

एमआय टीव्ही ३ एस ४३ इंचांच्या मॉडेलमध्ये १ जीबी रॅम असून इनबिल्ट स्टोरेज ८ जीबी आहे. दोन्ही टीव्हीमध्ये यूएसबी, वायफाय, एचडीएमआय सारखे फीचर्स आहेत. दोन्ही टीव्ही अँड्रॉईडवर चालणार असून शाओमीचा यूजर इंटरफेस देण्यात आला आहे.

Leave a Comment