एलिफन्टा गुहांना लवकरच वीजपुरवठा

elephanta
मुंबई : मुंबई नजीकच्या एलिफंटा गुहा या जागतिक ख्यातीचे पर्यटनस्थळ आहेत. मात्र वीज नसल्याने त्या वर्षानुवर्षे अंधारातच आहेत. मात्र एलिफन्टाला लवकरच वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी समुद्रातून केबल्स टाकण्यात येणार असून १५ ऑगस्टपासून त्याची सुरूवात करण्यात येणार असल्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितले. एलिफन्टा गुहांमध्ये गेल्या चाळीस वर्षांमध्ये वीजपुरवठाच करण्यात आलेला नाही. मात्र आता या ठिकाणी वीजपुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी समुद्रातून केबल्स टाकण्यात येणार आहेत. एका अमेरिकन कंपनीला हे काम देण्यात आले आहे. या कामासाठी २८ कोटी रूपयांचा खर्च येणार असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

तसेच पुढे बोलताना बावनकुळे शहर आणि उपनगरांत वीजेचे वेगवेगळे दर आहेत. त्यामुळे काही ग्राहकांना स्वस्त तर काही ग्राहकांना महाग दराने वीज मिळते. एकाच शहरात असे असमान वीज दर असणे योग्य नाही. मुंबईत लवकरच समान वीज दर लागू करण्यात येणार असून त्याबाबत अभ्यास करण्यासाठी सल्लागार नेमण्यात आल्याची घोषणा उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. विधानसभेत नियम २९३ अन्वये वीजेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते. मुंबईत बेस्ट,टाटा आणि रिलायन्स या तीन कंपन्यांमार्फत वीजपुरवठा होतो. शहरात बेस्टमार्फत तर उपनगरात टाटा आणि रिलायन्समार्फत वीजपुरवठा होतो. मात्र या तिन्ही कंपन्यांचे वीजदर वेगवेगळे आहेत. एकाच शहरात अशा प्रकारे असमान दर असणे योग्य नाही.त्यामुळे काही ग्राहकांना स्वस्त तर काही ग्राहकांना महाग दराने वीज मिळते.अशी विषमता योग्य नसून हे दर समान करण्याची मागणी अनेक आमदारांनी केली होती.

त्याला उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुंबईत तीन कंपन्यांमार्फत वीजपुरवठा होतो. तिन्ही कंपन्यांचे दर वेगवेगळे आहेत. मुंबईत समान वीजदर लागू करणे हे कठिण आहे. मात्र समितीचा अहवाल आल्यानंतर समान वीज दर करण्याचा मार्ग सापडणार आहे.तसेच ५०० युनिटच्या आत वापर असणा-या ग्राहकांना लाभ देण्याबाबतचा निर्णयही त्यात घेण्यात येणार आहे.

Leave a Comment