
स्मार्टफोन, संगणक, लॅपटॉपवरून केली जाणारी ईमेल अथवा चॅटिंग जागतिक तापमानवाढीस कारणीभूत ठरत आहेत यावर कदाचित विश्वास ठेवणे अवघड होईल. मात्र संशोधकांच्या म्हणण्यानुसार हे पूर्णतः सत्य आहे. डिजिटल टेक्नॉलॉजीचा विस्तार आणि विकास हवामान बदलास कारणीभूत ठरतोय कारण त्यांच्यामुळे वीजेचा वापर जास्त केला जात असल्याने कार्बन फूट प्रिंटमध्ये वाढ होतेय.
ईमेल व चॅटिंगचाही जागतिक तापमानवाढीला हातभार
शनिवारी जगभर ग्लोबल वार्मिंगसंदर्भात जनजागृतीसाठी अर्थ अवर पाळण्यात आला त्यामिमित्ताने वरील चर्चेला तोंड फुटले आहे. संशोधकांच्या मते अर्थअवर बाबत जागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ईमेल केल्या गेल्या, सोशल नेटवर्क कँपेनिंग केले गेले मात्र त्यामुळे नकळतच जागतिक तापवाढीला हातभार लागला व त्याची जाणीवही कुणाला झाली नाही.
संशोधकांच्या मते मुळातच डिजिटल उपकरणे बनविणे, लोकांपर्यंत ती पोहोचविणे व त्याचा वापर यातून कार्बन डाय ऑक्साईडचे उर्त्सजन होत असतेच. त्यालाच कार्बन फूटप्रिंट असे म्हटले जाते. युजरने एक छोटी ईमेल पाठविली तर त्यातून वातावरणात ४ ग्रॅम सीओटू बरोबर सीओटू ई ही अॅड होतो. दरवर्षी अशा पद्धतीने ४० अब्ज टन सीओटू वातारवणात येतो. म्हणजे १ दिवसांत ४ ग्रॅम सीओटू अॅड करणार्या पाच डझन मेल करणे हे प्रमाण १ किमी कार चालविल्यावर त्यातून बाहेर पडणार्या सीओटू इतके आहे.
