विदेशात पदवी मिळविणारे भारतीय डॉक्टर अनुत्तीर्ण

doctor
नवी दिल्ली : भारतातील निकष पूर्ण करण्यात विदेशात वैद्यकीय शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी अपयशी ठरत असून गेल्या १२ वर्षांत विदेशात वैद्यकीय पदवी मिळविलेल्या डॉक्टरांपैकी तब्बल ७७ टक्के भारतीय डॉक्टर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या परीक्षेत अपयशी ठरत आहेत. विदेशात वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना भारतात आल्यानंतर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या (एमसीआय) स्क्रिनिंग टेस्टला समोरे जावे लागते. त्यात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

परंतु यात तब्बल ७७ टक्के विद्यार्थी अपयशी ठरले आहेत. मुळात विदेशात एमबीबीएस किंवा अन्य वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर एमसीआयच्या स्क्रिनिंग टेस्टमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक असते. त्यानंतरच एक डॉक्टर म्हणून त्यांची नोंदणी मान्य केली जाते. या परीक्षेला विदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा या नावाने ओळखले जाते. परंतु या परीक्षेत अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण तब्बल ७७ टक्के असल्याचे माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागविलेल्या माहितीतून पुढे आले आहे.

या अंतर्गत २००४ ते १५ दरम्यानची आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आली असून, गेल्या १२ वर्षांत फक्त दोनवेळाच ५० टक्क्यांपेक्षा अधिक परीक्षाथ्र्यांनी स्क्रिनिंग टेस्टमध्ये यश मिळविले आहे. सप्टेंबर २००५ मध्ये सर्वाधिक ७६.८ टक्के वैद्यकीय पदवीधारकांनी कायम परवाना प्राप्त करण्यात यश मिळविले. त्यानंतर मार्च २००८ मध्ये आयोजित स्क्रिनिंग टेस्टमध्ये ५८.७ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले.

Leave a Comment