रशियातील कच्चे तेल भारताला मिळणार

crude-oil
नवी दिल्ली : रशियामधील तेल उत्पादक कंपनी रोसानेफ्तकडून सायबेरिया भागातील तेल क्षेत्रातील २९.९ टक्के एवढा हिस्सा भारतीय पेट्रोलियम कंपन्या इंडियन ऑईल, ऑईल इंडिया आणि भारत पेट्रोलियम यांनी खरेदी केला आहे. या क्षेत्रात भारतीय पेट्रोलियम कंपन्या एकूण ४.२ अब्ज डॉलर म्हणजे २८ हजार २५० कोटींची गुंतवणूक करणार आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि रोसानेफ्तचे सीईओ इगोर सेशीन यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या. यामुळे भारताला १.२ कोटी टन एवढे कच्चे तेल मिळणार आहे. या करारामुळे भारताची उर्जेची गरज भागण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे.

Leave a Comment