सॅमसंगचा गॅलेक्सी टॅब ए लाँच

taba
सॅमसंगने त्यांचा नवा गॅलॅक्सी टॅब ए २०१६ डच साईटवर लिस्ट केला आहे. या टॅबच्या लॉचिंगचा कोणताही गाजावाजा कंपनीने केलेला नाही. तसेच कंपनीच्या डच साईटवर लिस्टींग करताना हा टॅब कधी येणार अथवा त्याची किंमत याचीही माहिती दिली गेलेली नाही.

अन्य माहितीनुसार या टॅबसाठी ७ इंची टीएफटी डिस्प्ले, १.५ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल स्टोरेज, ते कार्डच्या सहाय्याने २०० जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ५ एमपीचा रियर व २ एमपीचा फ्रंट कॅमेरा, अँड्राईड ५.१ लॉलिपॉप ओ एस अशी फिचर्स दिली गेली आहेत. कनेक्टीव्हीटीसाठी वायफाय, ब्ल्यूटूथ ४.०, ग्लोनॉस व मायक्रो यूएसबी पोर्ट अशी ऑप्शन्स असून हा टॅब किड्स मोड सह आहे.

Leave a Comment