लाँचिंगआधीच समोर आला अॅपलच्या आयफोन SE चा व्हिडीओ

iphone
मुंबई – अॅपलचा आयफोन एसई २१ मार्चला लाँच होणारा असून याआधीच या फोनचा व्हिडीओ समोर आला आहे. अॅपलचा मोस्ट अवेटेड इव्हेंट म्हणून २१ मार्चकडे पाहण्यात येत होते. पण त्या अगोदरच आयफोन एसईचे फोटो आणि आता व्हिडीओ लिक झाला आहे.

अॅपलच्या ‘आयफोन एसई’ या हँडसेटची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. ४ इंचाच्या या आयफोनचे काही फोटो मध्यंतरी लीक झाले होते, मात्र आता आयफोनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. चीनमधील यू ट्यूब चॅनेल ‘नीक बीप’ने दावा केला आहे की, या व्हिडीओमध्ये दिसणारा फोन ‘आयफोन एसई’च आहे.

या व्हिडीओमध्ये आयफोन स्पष्टपणे दिसत आहे. जर या व्हिडीओमधील फोनसारखा प्रत्यक्षातील आयफोनचा लूक असल्यास, आयफोन एसई हा आयफोन ६ सारखा दिसणारा असेल. चार इंचाचा डिस्प्ले असलेल्या या आयफोनमध्ये अॅपल प्ले, एनएफसी, एलटीई कनेक्टिव्हिटी असेल. नव्या आयफोनमध्ये ८ मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि ए९ SoC प्रोसेसर दिला जाणार आहे. १ जीबी रॅम असेल, अशीही चर्चा आहे. दरम्यान, चीनमधील या यू ट्यूब चॅनेलने रिलीज केलेला हा व्हिडीओ खरा की खोटा, हे २१ मार्चलाच स्पष्ट होईल.

Leave a Comment