सरकार करणार माल्ल्यांच्या ‘पर्सनल जेट’चा लिलाव

vijay-mallya
नवी दिल्ली- नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून लंडनला पळून गेलेले उद्योगपती विजय माल्ल्यांच्या अडचणी दिवसागणिक वाढत असून बॅंकांसोबतच आता सरकार देखील माल्यांच्या प्रॉपर्टीचा लिलाव करणार आहे. यात माल्यांच्या पर्सनल एअरबस एसीजे ३१९चा देखील समावेश आहे. माल्याच्या पर्सनल जेटची विक्री करून सरकार ८१२ कोटी रुपयांचा सर्व्हिस टॅक्स व दंडाची रक्कम वसूल करणार आहे. दुसरीकडे, माल्या सक्तवसुली संचालनालयासमोर(ईडी) चौकशीसाठी हजर न झाल्यास त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Leave a Comment