सिगरेट, बिअर पुरविणारे बेवी अॅप

bevy
मौजमजेच्या सार्‍या वस्तू घरपोच व जलद पोहोचविणारे बेवी हे अॅप सध्या मध्य लंडनमध्ये फारच लोकप्रिय झाले आहे. हे अॅप बिअर, सिगरेट, पब स्नॅक्स सारखे पदार्थ, पॅरासिटामोल सारखी औषधेच नाही तर कंडोम्सही ऑर्डर नोंदविताच २० मिनिटांत घरपोच आणून देते.

हे अॅप फ्री आहे व ते ऑन डिमांड सर्व्हीसवर आधारित आहे. त्यासाठी स्मार्टफोनवर युजरला अकौंट बनवावे लागते व फेसबुकवर लॉग इन करावे लागते. त्यावर प्लेस केलेली कोणतीही ऑर्डर २० मिनिटात पोहोचविली जाते. त्याला जीपीएस ट्रकिंगचीही सुविधा आहे. आठवड्यातले तीन दिवस सायंकाळी ५ ते पहाटे पाच या वेळात या अॅपचा वापर करता येतो. सध्या ते मध्य लंडनपुरते मर्यादित आहे मात्र लवकरच लंडनच्या अन्य भागातही ते लाँच केले जात आहे.

Leave a Comment