
हैदराबाद – २०१०-११ ते २०१३-१४ या कालखंडात भारतातील राजकीय पक्षांमध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस (आयएनसी) चे उत्पन्न सर्वात जास्ती असून ते १६८७.१२ कोटी रुपये असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स या स्वयंसेवी संस्थेने आपल्या अहवालाद्वारे दिली आहे. २०१४-१५मध्ये भाजप, आयएनसी आणि एनसीपी वगळता सर्व राजकीय पक्षांचे २०१०-११ ते २०१४-१५ या पाच आर्थिक वर्षात ४२६१.२३कोटींचे उत्पन्न या अहवालात दिलेले आहे. काँग्रेसच्या सर्वोच्च उत्पन्नानंतर २०१४-१५ मध्ये भाजपचे उत्पन्न १४७५.४४ कोटी असल्याचे सदर स्वयंसेवी संघटनेने म्हटले आहे.
राजकीय पक्षांमध्ये काँग्रेसचे उत्पन्न सर्वाधिक
२०१०-११ ते २०१४-१५ काळासाठी ‘ऍनालिसिस ऑफ इन्कम टॅक्स रिटर्न्स अँड डोनेशन्स रिसीव्हड् बाय नॅशनल अँड रिजनल पार्टीज ऑफ आंध्रप्रदेश अँड तेलंगण’ नावाने तयार केलेला अहवाल आंध्रप्रदेश अँड तेलंगण इलेक्शन वॉच तसेच एडीआरकडून बनविण्यात आला होता. इन्कम टॅक्स रिटर्न्सवरून एकंदर उत्पन्नाच्या ५४.३९ टक्के रक्कम देणग्यांच्या स्वरुपातील असल्याचे बसपने म्हटले आहे. पक्षाला देणग्यांद्वारे २० हजारावरील एकही रक्कम मिळाली नसल्याची माहिती सदर अहवालाने दिली आहे. आरटीआयखाली सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक राजकीय पक्षांनी आपल्या आयव्याची माहिती दिली पाहिजे, अशी शिफारस एडीआरने केली होती.
