देशात २१ लाख लोक एचआयव्हीबाधित

hiv
नवी दिल्ली – २१ लाखापेक्षा अधिक लोक भारतात एचआयव्ही विषाणूने बाधित आहेत. ही आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी लोकसभेत सादर केली. एकूण २१ लाख १७ हजार लोक देशात एचआयव्हीने संक्रमित आहेत असे लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगण्यात आले.

एवढेच नाही तर यूएनआयडीएसच्या २०१४च्या आकलनानुसार भारतात एचआयव्ही संक्रमित लोकांची संख्या तिसरी सर्वात मोठी संख्या असू शकते. दक्षिण आफ्रिकेत ६८लाख आणि नायजेरियात ३४ लाख लोक एचआयव्हीने प्रभावित आहेत. हे रुग्ण एंटीरेट्रोव्हायरल थेरेपीच्या (एआरटी) मदतीने जीवन जगत आहेत असेही उत्तरादाखल सांगण्यात आले. वर्तमान काळात देशात एकूण ५२४ एआरटी केंद्रे आहेत, जी ही थेरेपी मोफत स्वरुपात उपलब्ध करत आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment