‘गूगल’चे माजी सीईओ ‘आयफोन’च्या प्रेमात

shimit
सेऊल: ‘गूगल’चे माजी कार्यकारी अधिकारी आणि ‘अल्फाबेट’चे विद्यमान कार्यकारी अध्यक्ष एरीक शिमिट यांना ‘आयफोन’ वापरताना माध्यमांच्या छायाचित्रकारांनी टिपले आहे.

या पूर्वी देखील त्यांना ‘अँड्रॉईड’ ऐवजी ‘ब्लॅकबेरी’ वापरताना टिपण्यात आले होते. शिमिट यांनी ‘ब्लॅकबेरी’चा ‘की बोर्ड’ आवडत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

शिमिट हे दक्षिण कोरियात झालेल्या ‘गूगल’च्या ‘अल्फा गो’ एआय यंत्रणेच्या कार्यक्रमात ‘आयफोन’चा वापर करून छायाचित्रण करताना सेऊल येथील स्थानिक वृत्तपत्र ‘ओसेन’च्या छायाचित्रकारांनी टिपले.

शिमिट हे एप्रिल २०११ पर्यंत ‘गूगल’चे मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी होते.

Leave a Comment