‘विलफुल डीफॉल्टर्स’ना निधी उभारण्यास बंदी

sebi
नवी दिल्ली: ‘विलफुल डीफॉल्टर्स’ असलेल्यांना शेअर बाजार अथवा बाँडसारख्या सार्वजनिक क्षेत्राद्वारे निधी उभारण्यास ‘सेबी’ने बंदी घातली आहे. तसेच अशा व्यक्तींना शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांच्या संचालक पदावरही राहता येणार नाही; असे निर्देश सेबीने दिले आहेत.

मद्यसम्राट विजय माल्ल्या यांनी १७ बँकांना ९ हजार कोटी रुपयांचा गंडा घालून लंडनला पलायन केल्यानंतर ‘सेबी’ने अशा प्रकरणांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक पावले उचलली आहेत.

‘विलफुल डीफॉल्टर्स’ना म्युचुअल फंड अथवा ब्रोकरेज संस्थाही सुरू करता येणार नाहीत.
रिझर्व बँकेच्या निर्देशानुसार ‘विलफुल डीफॉल्टर्स’ ठरविल्या गेलेल्या कोणत्याही कंपनी अथवा व्यक्तीला हे नियम लागू होणार आहेत. ‘विलफुल डीफॉल्टर्स’ म्हणून जाहीर केल्याच्या क्षणापासून हे नियम लागू होणार असल्याचे माहिती ‘सेबी’चे अध्यक्ष यू के सिन्हा यांनी सेबीच्या महत्वपूर्ण बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

Leave a Comment