लवकरच बदलणार पेट्रोल-डिझेलच्या किंमती !

petrol
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत होत जाणारी घट पाहून तुम्ही खुश तर झाला असाल, पण आता मात्र तुम्हाला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, कच्च्या तेल्याच्या किंमतींमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांच्या उच्च स्तरावर म्हणजेच ४० डॉलर प्रति बॅरलवर कच्च्या तेलाच्या किंमती पोहचल्या आहेत. त्यामुळे येत्या दोन महिन्यांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती ५० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कच्च्या तेलाचे अमेरिकेमधील उत्पादन घटल्यामुळे आणि २० मार्च रोजी क्रूड उत्पादक देशांची संघटना ‘ओपेक’च्या बैठकीत उत्पादन कमी झाल्याच्या कारणामुळे ही वाढ होणार आहे. ‘ब्रोकरेज हाऊस क्रेडि सुइस’नुसार, फेब्रुवारी महिन्यापासूनच क्रूड ऑईलच्या फंडामेन्टलमध्ये बदल सुरू झाले आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वैश्विक अर्थव्यवस्थेमध्ये सध्या तरी मंदीचे कोणतेही चिन्ह दिसत नसल्यामुळे, क्रूड ऑईलच्या किंमतीत सुधार झाली आहे. त्यामुळे मे महिन्यापर्यंत कच्च्या तेलाची किंमत ५० डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.

Leave a Comment