भारतात सर्वाधिक ‘कॉल ड्रॉप’चे प्रमाण

call-drop
नवी दिल्ली – जगाच्या तुलनेत भारतात ‘कॉल ड्राप’च्या समस्येचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे अलिकडेच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

ही माहिती “रेडमॅंगो एनालेटिक्‍स‘ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. हे सर्वेक्षण देशातील मुंबई, कोलकाता, बंगळूरु आणि जम्मू काश्‍मीरमधील २० शहरांमध्ये करण्यात आला होता. त्यातून जगाच्या तुलनेत भारतामध्येच कॉल ड्रापचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. भारतीय दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) साधारण २ टक्‍क्‍यांपर्यंतचे कॉल ड्राप ग्राह्य मानले आहेत. तर कॉल ड्रापचे जगातील सर्व साधारण प्रमाण तीन टक्क्यांपर्यंत आहे. मात्र भारतातील बहुतेक भागांमध्ये कॉल ड्रापचे प्रमाण ४.७३ टक्के असल्याचे आढळले आहे. कॉल ड्राप झाला तर त्यावर दूरसंचार कंपन्यांनी नुकसान भरपाई देण्याचे निर्देश ट्रायने दिले आहेत. मात्र त्या निर्णयाविरूद्ध दूरसंचार कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. १५ मार्चपर्यंत या प्रकरणाची सुनावणी चालणार असून १७ मार्चला निकाल येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कमी किंमतीतील फोन कॉल ड्रापला कारणीभूत ठरत असल्याचा दावा दूरसंचार कंपन्यांनी केला आहे.

Leave a Comment