गुगलचे अॅड्राईड व्हर्जन एन बीटा प्रिव्ह्यूसाठी जारी

android-n
गुगलने अचानक त्यांचे अँड्राईड ओएसचे पुढचे व्हर्जन एन बीटा डेव्हलपर्सच्या प्रिव्ह्यूसाठी जारी केले आहे. यामागे हे व्हर्जन उत्पादनासाठी देण्याअगोदर डेव्हलपर्सकडून फिडबॅक घेऊन ही ओएस अधिक सक्षम आणि निर्दोष करण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. मे महिन्यातील गुगलच्या आयओ मध्ये एन व्हर्जन लाँच केले जाईल असे संकेत दिले गेले होते मात्र प्रत्यक्षात हे व्हर्जन अगोदरच लाँच करून गुगलने आश्चर्याचा धक्का दिला आहे. हे व्हर्जन या वर्षाच्या तिसर्‍या तिमाहीत अधिकृतपणे लाँच केले जाणार आहे.

कंपनीचे उपाध्यक्ष हिरोशी लॉकाइमर या संदर्भात म्हणाले की या व्हर्जनमध्ये अनेक नवी फिचर्स दिली गेली आहेत. साईड बाय साईड अॅप मोड, विंडो सपोर्ट, ब्रँड नोटिफिकेशन, डायरेक्ट बूट, पॉवर सेव्हींग डोज मोड, नंबर लॉक, मल्टी लँग्वेज लोकल सपोर्ट अशी व अन्य फिचर्स यात सामील केली गेली आहेत. त्यामुळे उत्पादन सुरू करण्याअगोदर डेव्हलपर्स कडून त्याचा फिडबॅक मिळाला तर ही सिस्टीम अधिक निर्दोष करता येणार आहे. एन ला नेक्सस ६ पी, फाईव्ह एक्स, नाईन, प्लेअर, पिक्सल सहा व जनरल मोबाईल फोरजी वापरून पाहता येणार आहे असेही त्यांनी सांगितले.