सॅमसंगचे मिडरेंज जे वन व जे वन मिनी लाँच

jimini
सॅमसंगने स्वस्त स्मार्टफोन बाजारातील आपला हिस्सा वाढविण्यासाठी दोन बजेट स्मार्टफोन सादर केले असून ते कंपनीच्या रशिया व फिलिपिन्स साईटवर लिस्ट केले आहेत. गॅलेक्सी जे वन व जे वन मिनी असे हे दोन फोन गोल्ड, सिल्व्हर रंगात उपलब्ध करून दिले गेले आहेत. त्यांच्या किमती वा भारतीय बाजारात ते कधी येणार याविषयीचा खुलासा केला गेलेला नाही.

गॅलेक्सी जे वन साठी ४.५ इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले, अँड्राईड ५.१ लॉलिपॉप ओएस,१ जीबी रॅम, ८ जीबी मेमरी ती कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ५ एमपीचा रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह तर २ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. ड्युअल सिमचा हा फोन फोर जी आहे तसेच वायफाय, ब्ल्यू टूथलाही सपोर्ट करतो.

जे वन मिनीसाठी ४ इंचाचा टीएफटी डिस्प्ले व ७५० एमबीची रॅम दिली गेली आहे. बाकी सर्व फिचर्स जे वन प्रमाणेच आहेत मात्र हा स्मार्टफोन फोर जीला सपोर्ट करत नाही.

Leave a Comment