अवघ्या पाच दिवसाची देशातील तरूण पॅनकार्डधारक

pan-card
पाटणा : आता बिहारमधील एक चिुमरडी पॅनकार्ड किती आवश्यक आहे हे सांगायला सज्ज झाली आहे. या पाच दिवसाच्या चिमुकलीने देशातील सर्वात तरूण पॅनकार्डधारक होण्याचा मान पटकावला आहे. पाचव्या दिवशी आशी या चिमुरडीच्या हाती पॅनकार्ड पडले आहे.

२१ फेब्रुवारीला एका गोंडस मुलीला कुमार सजल आणि स्मृती सिन्हा यांनी जन्म दिला. त्यानंतर तिच्या पॅनकार्डसाठी अर्ज करण्यात आला आणि आशीला अवघ्या ५ दिवसात हे पॅनकार्ड मिळाले आहे. २६ तारखेला पॅनकार्ड प्राप्त झाले. यापूर्वी जयपूरचा आर्यन चौधरी सर्वात तरुण पॅनकार्डधारक होता. सात दिवसांचा असताना त्याला पॅनकार्ड मिळाले होते. आपल्या चिमुरडीचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये येण्यासाठी शिफारस केल्याची माहिती आशीचे पिता सजल यांनी दिली.

यापूर्वीचे सर्वात तरुण पॅनकार्डधारक
आर्यन चौधरी (जयपूर) ७ दिवस
आहना मोदी (राजकोट) १० दिवस
बिपाशा मोडक (प. बंगाल) २२ दिवस
अक्षिता (चेन्नई) ४९ दिवस
कृष्णा टॅकर (मुंबई) ५६ दिवस
आयुष राजन (ओदिशा)३ महिने

Leave a Comment