२१ मार्चला लाँच होणार आयफोन एसई

iphone
मुंबई – २१ मार्चला अॅपलचा बहुप्रतिक्षित आयफोन एसई हा फोन लाँच होणार आहे. अॅपलचा हा फोन एका इव्हेंटमध्ये लाँच होणार असल्याची माहिती गेल्या सहा महिन्यापासून फिरत होती. या नव्या फोनचे नाव आयफोन एसई म्हणजे स्पेशल एडीशन असे आहे. हा फोन ४ इंच स्क्रिनचा असून आयफोन ५एस सारखाच असणार आहे. आयफोन ५एसच्या डिझाइनमध्ये थोडा बदल करून हा आयफोन एसई लाँच करण्यात येणार आहे.

आयफोन एसई हा अगदी आयफोन ५एस पेक्षा अगदी थोडा वेगळा आहे. याला कर्व ग्लास देण्यात आली आहे. आयफोन एसई हा अॅपलचा सर्वात स्वस्त फोन असून तो अगदी सहज हाताळता येण्यासारखा असणार आहे. अद्याप या फोनची किंमत कळलेली नाही मात्र हा फोन सर्वात स्वस्त असल्याचे सांगितले जात आहे.

आयफोन एसई सोबत कंपनी स्मॉलर आयपॅड प्रो पण मोफत देणार आहे. या फोनमध्ये ३डी टच मिळणार नाही. तसेच सांगितले जाते की, सँमसंग साइड बारसोबतच कर्व्ड डिसप्लेचे डिवाइस देखील लाँच करणार आहे. त्याचबरोबर अशी ही चर्चा होती की, कंपनीने एलजी आणि सँमसंसोबत समझोता केला आहे. त्यातच आज कंपनीने नवीन फोन लाँच करण्याची माहिती समोर आली.

Leave a Comment