ब्लू ने भारतात आणले दिवा टू, टँक टू फिचर फोन

diva-2
अमेरिकन फोन उत्पादक कंपनी ब्लू ने त्यांचे दिवा टू व टँक टू हे दोन फिचर फोन भारतीय बाजारात सादर केले आहेत. हे दोन्ही फोन फक्त अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती अनुक्रमे १६४९ व १२९९ रूपये आहेत आणि या दोन्ही फोनसाठी १ वर्षांची तर फोन अॅक्सेसरीज साठी सहा महिन्यांची वॉरंटी दिली गेली आहे.

दिवा टू साठी २.४ इंची डिस्प्ले,०.३ एमपी चा रियर कॅमेरा, ३२ एमबी रॅम, ३२ एमबी मेमरी ती मायक्रोकार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ड्युअल सिम, टूजी सपोर्ट, ब्ल्यू टूथ ऑप्शन दिला गेला आहे. टँक टू साठीही हीच फिचर्स आहेत मात्र त्याची बॅटरी १९०० एमएएच ची आहे. गेल्या माहिन्यात या कंपनीने त्यांचा लाईफ मार्क हा स्मार्टफोन ८९९९ रूपयांत लाँच केला आहे.

Leave a Comment