
जगात अनेक इमारती आपापल्या खास वैशिष्ठ्यांमुळे पर्यटकांचे आकर्षण बनलेल्या आहेत. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील सॅन लुई अेबिस्पो काऊंटी मधील क्यूस्टा एनकान्डाटा नावाचा महाल असेच लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. दाट जंगलात आणि पहाडाच्या माथ्यावर असलेला हा महाल हर्स्ट कॅसल या नावाने ओळखला जातो. दरवर्षी या महालाला किमान १० लाख पर्यटक भेट देतात असे समजते.
दाट जंगलातील पहाडी महालात पर्यटकांची होते गर्दी
हा महाल पत्रकार विलियम रंडोल्फ हर्स्ट यांच्यासाठी १९१९ ते १९४७ या काळात बांधला गेला. ५१ साली त्यांच्या मृत्यू झाल्यानंतर तो कॅलिफोर्निया प्रशासनाकडे आला.१९५७ मध्ये तो टूरिस्ट स्पॉट म्हणून जाहीर करण्यात आला. हर्स्ट यांच्या काळात येथे हॉलीवूड कलाकार, राजकरणी यांची मोठी वर्दळ असे.
या महालात ५६ बेडरूम्स, ६१ टॉयलेट, १९ सिटींग रूम्स, १२७ एकरात पसरलेला बगीचा, इनडोअर, आऊटडोअर स्विमिग पूल, टेनिस कोर्ट, मूव्ही थिएटर, रॉयल लायब्ररी, डायनिंग, ज्वेल बॉक्स, एअर फिल्ड आणि सर्वात मोठे खासगी झू आहे.९० हजार चौरस फूटांपेक्षाही अधिक जागेत या महालाचा पसारा आहे.
