केवळ ५० रूपयात तरुण बनला करोडपती

lottery
कोलकाता – आपल्यापैकी सर्वांचे करोडपती व्हायचे स्वप्न असते. अपवाद वगळता इतरांचे स्वप्न हे केवळ स्वप्नच राहते. कारण त्यासाठी कष्टाची गरज असते. मात्र, पश्चिम बंगाल येथील एक तरूण कोणतेही कष्ट न घेता करोडपती बनला आहे. अवघ्या ५० रूपयांत नोकरीच्या शोधात भटकत असलेला हा तरूण करोडपती बनला आहे.

या तरूणाचे नाव मोफिजुल रहाना शेख असे असून, तो केवळ २२ वर्षांचा आहे. नोकरीच्या शोधात भटकत असताना केवळ नशीब आजमवायचे म्हणून त्याने ५० रूपये खर्च केले आणि लॉटरीचे तिकीट काढले. जगभरात अनेक लोक लॉटरीचे तिकीट काढून नशीब आजमावतात. तसेच शेख याने देखील नशीब आजमवावले आणि तो खरोखरच भाग्यवान ठरला आहे. त्याला चक्क एक कोटीची लॉटरी लागली.

या वृत्ताला तेथील स्थानिक पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालदा जिल्ह्यातील लक्ष्मीपुर येथील मोफिजुलने चार मार्च या दिवशी ‘कोरूणा’ लॉटरीचे तिकीट खरेदी केले. त्याने हे तिकीट वेल्लिमदकुन्नु येथून खरेदी केले आहे. दुसऱ्याच दिवसी लॉटरीचा निकाल लागला.

पोलिसांनी पूढे म्हटले आहे, मोफिजूल मंगळवारी पोलिसांकडे पोहोचला. त्याने त्यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली. पोलिसांना संरक्षण मागताना त्याने म्हटले की, माज्या जीवाला धोका असून, कोणीतरी हल्ला करून माझ्याकडून तिकीट पळवून नेईल. त्याची मागणी मान्य करत पोलिस त्याला एका बॅंकेत घेऊन गेले. तेथे त्यांनी त्याचे तिकीट जमा केले.

Leave a Comment