अवघ्या १२ हजारात अॅपलचा ‘आयफोन ५एस’ !

aaple
मुंबई : अॅपल आणखी एक सुखद धक्का आयफोन खरेदी करणाऱ्या मोबाईल प्रेमींना देण्याच्या तयारीत असून आयफोन ५एस’च्या किमतीत तब्बल ५० टक्के कपात करण्यात येण्याची शक्यता असल्यामुळे यापूर्वीच अर्ध्या किमतीवर आलेल्या आयफोनची किंमत १२ हजार रुपयांपर्यंत येण्याची चिन्हे आहेत. आयफोन ५एस अॅपलचा भारतातील बेस्ट सेलर फोन आहे.

या महिन्यातच अॅपल आपला नवा ४ इंचाचा ‘आयफोन एसई’ बाजारात आणत असल्यामुळे या फोनची विक्री वाढवण्यासाठी अॅपल आपला ‘आयफोन ५एस’ चा स्टॉक संपवणार आहे. त्यामुळे ‘आयफोन ५एस’ ची किंमत निम्म्यावर म्हणजे १२ हजार रुपयांपर्यंत येण्याची शक्यता आहे.

‘आयफोन ५एस’ च्या यापूर्वी डिसेंबर २०१५ मध्येच किंमतीत भरघोस कपात करण्यात आली होती. सप्टेंबर २०१५ मध्ये ४४ हजार रुपये किंमत असलेल्या या फोनची किंमत डिसेंबर २०१५ मध्ये २२ हजार रुपयांपर्यंत उतरली होती. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यातच अॅपल पुन्हा एकदा या फोनची किंमत घटवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

Leave a Comment