हा आहे कर्ज देणारा भिकारी सावकार

brggar
मुंबई – तुम्हाला आज आम्ही एका अशा व्यक्तीसंदर्भात सांगणार आहोत जो एक करोडपती भिकारी आहे. बसला ना धक्का तुम्हाला… पण हा भिकारी फक्त भिक मागत नाही तर फक्त गरजु लोकांना कर्ज देतो आणि तेही कमी व्याजदरामध्ये. तुम्हाला हे वाचुन नक्कीच धक्का बसला असेल पण आज आम्ही तुम्हाला या भिका-यासंदर्भात काही खास माहिती सांगणार आहोत.

पप्पू असे या भिका-याचे नाव असुन तो बिहारची राजधानी पाटणात राहतो. पप्पूकडे १.२५ कोटी रुपयांची संपत्ती असल्यामुळे हा एक करोडपती भिकारी आहे. हा भिकारी तुम्हाल पाटणामधील कुठल्याही गल्लीत भिक मागताना दिसेल. स्वत:चे बँक अकाऊंट देखील पप्पूचे आहे आणि ते सुद्धा एक नाही तर चार-चार बँक अकाऊंट्स आहेत.

भिक मागण्याआधी पप्पू हा एक चांगला आणि स्वस्थ मुलगा होता. पप्पूला इंजिनिअर बनायचे होते मात्र, एका दुर्घटनेमध्ये पप्पूच्या स्वप्नांवर पाणी फिरले. यानंतर पप्पूने स्वत:च्या संगोपणासाठी आपली संपत्ती विकली. एके दिवशी पप्पूला कल्पना सुचली की आपल्या तुटलेल्या हात आणि पाय याच्या आधारावर आपण भिक मागु शकतो. मग त्याने भिक मागण्यास सुरुवात केली. सध्या पप्पू पाटणा रेल्वे स्थानकावर भिक मागतो.

रेल्वे स्थानकावरील भिका-यांना आरपीएफ रोज बाहेर काढत असते. मात्र, तरिही पप्पू नेहमी तेथेच जात असे, या दरम्यान आरपीएफ अधिका-यांनी एक दिवशी पप्पूला ताब्यात घेतले. यावेळी पप्पूकडून पोलिसांना ४ ते ५ एटीएम कार्ड्स मिळाले यामध्ये जवळपास ५ लाख रुपये बँलेंस होते. यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता पप्पूने मान्य केले की तो एक करोडपती आहे.

पप्पू ने अनेक लहान-मोठ्या व्यापा-यांना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलेले आहे. आरपीएफने पप्पूच्या उपचारासंदर्भात विचारले तर त्याने सांगितले की जर माझ्यावर उपचार झाले तर मग मी भिक कसा मागणार. यावरुन स्पष्ट होते की पप्पू गरज आहे म्हणून भिक मागत नाही तर भिक मागणे हा पप्पूचा एक व्यवसाय आहे.

Leave a Comment