दुसऱ्या दिवशी रेल्वेच्या वेटिंग तिकिटावर प्रवास करु शकाल!

indian-railway
नवी दिल्ली : रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी आता वेटिंग तिकिटावर दुसऱ्या दिवशी तुम्हाला प्रवास करणे शक्य होणार आहे. रेल्वे याबाबतची नवी योजना लागू करण्याची शक्यता असून अधिकारी वर्ग त्यावर काम करीत आहेत.

रेल्वेचे तुम्ही वेटिंग तिकिट काढले आणि तुम्हाला त्याच दिवशी प्रवास करणे शक्य झाले नाही तर तुम्ही त्याच तिकिटावर दुसऱ्या दिवशी प्रवास करु शकता. त्यासाठी तुम्हाला दुसरे तिकिट काढण्याची गरज नाही. मात्र, त्यासाठी तुम्हाला तिकिट खिडकीवर जाऊन तशी विनंती करावी लागेल.

ही नवी योजना सुरु झाल्यानंतर ही सुविधा प्रथम तुम्हाला काही गाड्यांमध्येच मिळणार आहे. सुरुवातीला राजधानी, दुरन्तो, संपर्क क्रान्ती एक्सप्रेस याच गाड्यातून ही सुविधा मिळणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यानंतर अन्य दुसऱ्या गाड्यांसाठी सुविधा लागू होणार आहे.

या सुविधेसाठी रेल्वे प्रवाशाला एक विनंती करावी लागणार आहे. या योजनेला रेल्वेने अल्टरनेट ट्रेन अकोमोडेशन नाव दिले आहे. प्रवाशाला आपल्या तिकिटासाठी त्या स्टेशनवरुन दुसऱ्या रेल्वेसाठी कन्वर्ट करण्याची विनंती करावी लागेल. याशिवाय प्रवाशाला आणखी दुसऱ्या स्पेशल ट्रेनसाठी रिक्वेस्टच्या आधारावर तिकिट दिले जाईल, अशी रेल्वेची योजना आहे.

Leave a Comment