शतकातील सर्वात मोठय़ा मंदीकडे ब्राझीलची वाटचाल

brazil
नवी दिल्ली : सध्या अतिशय डबघाईला ब्रिक्स देशांमधील एक असणा-या ब्राझीलची आर्थिक स्थिती आली असून येथे मंदीचे वारे घोंघावण्यास सुरूवात झाली आहे. याचे संकेत ब्राझील सरकारने दिले असून, त्यांचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) २०१५मध्ये ३.८टक्केने घसरले आहे. देश कमीत कमी एका शतकातील सर्वात मोठय़ा मंदीच्या दिशेने वाटचाल करत असल्याची भीती ब्राझील सरकारने व्यक्त केली आहे.

अर्थव्यवस्थेची ही स्थिती आश्चर्यचकित बाब नसली तरी, डिल्मा रोसेफ सरकारपुढे असलेल्या गंभीर समस्या सर्वांसमोर आल्या आहेत. देशाच्या सांख्यिकी कार्यालयानुसार, २०१५ मध्ये जीडीपीमध्ये नोंदविण्यात आलेली घसरण 1990 नंतर पहिल्यांदाच नोंदविण्यात आली आहे. तेव्हा आर्थिक विकास दरामध्ये ४.३ टक्के घसरण नोंदविण्यात आली होती.

Leave a Comment