हब्बल कॅनडातून भारतात हलविणार मुख्यालय

hubble
इंटरनेट संबंधीची उपकरणे बनविणारी कॅनडातील हब्बल ही कंपनी त्यांचे मुख्यालय भारतात हलविणार असून पुढच्या दोन वर्षात भारतीय शेअर बाजारात कंपनीचे लिस्टींग करण्याचाही विचार केला जात आहे. ही कंपनी १ एप्रिलपासून भारतातील मुख्यालय सुरू करत आहे असे कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष डिनो ललवाणी यांनी सांगितले. भारतातील कंपनीच्या कार्यालयात कंट्री हेड म्हणून ओचिंत्य शर्मा यांची नेमणूक केली गेली असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

या कंपनीमध्ये राऊटर्स, मोडेम, लँडलाईन फोन्स, मोबाईल अॅक्सेसरीज यांचे उत्पादन केले जाते. तसेच इंटरनेटशी जोडलेले होम सर्व्हेलन्स सिस्टीम, स्मार्ट होम सोल्यूशन, व डेव्हलपमेंट क्षेत्रातही ही कंपनी कार्यरत आहे. कंपनी इंटरनेट युज्ड वायरलेस सर्व्हेलन्स कॅमेरा लाँच करण्याच्याही विचारात असून हा कॅमेरा २९९५ रूपयांत उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Leave a Comment