राज्यात स्वस्त होणार पेट्रोल, डिझेल, एलपीजी

petrol
मुंबई – तेल कंपन्यांनी महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि रॉकेलवरील लावलेला अतिरिक्त अधिभार कमी करण्यासाठी ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांची पेट्रोलमंत्री केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायु मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या बरोबर झालेली बैठक यशस्वी ठरल्यामुळे राज्यात आता पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी स्वस्त होणार आहे.

राज्य विशेष अधिभारद्वारे बेकायदेशीर अतिरिक्त वसूली करत असल्याची तक्रार फेडरेशन ऑॅफ ऑॅल महाराष्ट्र पेट्रोल डिलर असोसिएशनने केली होती. यावर बापट यांनी तेल कंपन्यांची बैठक घेतली. या बैठकीत अतिरिक्त वसुली झाल्याचे मान्य करून त्याबाबत विशेष अधिभार कमी करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री प्रधान यांच्याकडे पाठविण्याचे मान्य केले होते.

तेल कंपन्यांनी यावर अतिरिक्त वसुलीपैकी २०१४-१५ मधील अतिरिक्त वसुलीबाबत राज्य विशेष अधिभार कमी करण्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री प्रधान यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावाचा पाठपुरावा म्हणून बापट यांनी केंद्रीय मंत्री प्रधान यांची भेट घेतली. प्रधान यांनी या प्रस्तावास मान्यता दिली. या मान्यतेमुळे येत्या आठ दिवसांत राज्यात पेट्रोलवर ९५ पैसे, डिसेलवर ६६ पैसे स्वस्त होईल.

घरगुती वापराचे इंधनही काही प्रमाणात स्वस्त होईल. बैठकीत २०१५-१६ मधील अतिरिक्त वसूलीबाबत तेल कंपन्या लवकरच प्रस्ताव तयार करणार असून याबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयही अनुकूल आहे. या बैठकीस आमदार शोभा फडणवीस तसेच पेट्रोलियम डिलर असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Comment