‘बुगाटी’ची फास्टेस्ट सुपरकार ‘शिरॉन’ लॉन्च

bugatti
नवी दिल्ली- फ्रान्सची कार निर्माता कंपनी ‘बुगाटी’ने जिनेव्हा मोटर शोमध्ये आपली नवी स्पोर्ट्स सुपरकार ‘शिरॉन’ सादर केली. शिरॉन ही जगातील फास्टेस्ट सुपरकार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. डोळ्याची पापणी लवत नाही, तितक्यात ही कार १००चा स्पीड घेते. या कारचा टॉप स्पीड ताशी ४१७ किमी आहे. पूर्णपणे न्यू जनरेशनची शिरॉन ही कार आहे. १९९५किलोग्रॅम वजन असूनही या कारचा स्पीड ताशी ४१७ किमी आहे. १५०० हॉर्स पॉवरचे इंजिन शिरॉनमध्ये देण्यात आले आहे. १९ कोटी रुपये शिरॉनची किंमत आहे. ही कार डिसेंबर २०१६ पर्यंत बाजारात उपलब्ध होईल.

Leave a Comment