‘विवो’ने लाँच केला ६ जीबी रॅमचा स्मार्टफोन

vivo
नवी दिल्ली : ६ जीबी रॅमचा जगातील पहिला स्मार्टफोन स्मार्टफोन क्षेत्रातील चीनची अग्रगण्य कंपनी ‘विवो’ने लाँच केला आहे. ‘विवो एक्सप्ले ५ अल्टीमेट’ असे या स्मार्टफोनचे नाव असून या फोनची किंमत अंदाजे ४४,३०० रूपये असेल.

‘विवो एक्सप्ले ५ अल्टीमेट’मध्ये ५.४ इंचाचा ड्युअल एज क्यूएचडी सूपर एमोल्डेड डिस्प्ले देण्यात आला आहे. अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉपचे ऑपरेटींग सिस्टिम, ६ जीबी रॅम, २.१५ गीगाहर्ट्ज, स्नॅपड्रगन ८२०चा प्रोसेसर देखील देण्यात आला आहे. याचा रिअर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह १६ मेगापिक्सल आणि फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे. याची इंटरनल स्टोअरेज क्षमता १२८ जीबीची आहे. यात ४जी एलटीई, वाय-फाय, ब्ल्यूटय़ूथ ४.१, जीपीएस, एजीपीएस अशा कनेक्टीव्हीटी देखील देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment