जिओनी मेक इन इंडिया अंतर्गत देणार १५ हजार जॉब

jioneee
चिनी स्मार्टफोन कंपनी जिओनीने त्यांच्या भारतातील पाया मजबूत करण्यासाठी मेन इन इंडिया अंतर्गत पुढच्या वर्षात देशात सेल्समनची संख्या १५ हजारांवर नेण्याचा आणि कंपनीची आणखी २०० ब्रँड स्टोअर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिओनी इंडियाचे प्रमुख अरविंद वोरा यांनी सांगितले.

ते म्हणाले, कंपनी भारतात फोन उत्पादन प्रकल्पासाठी ५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. जूनपर्यंत भारतात विकली जाणारी आमची सर्व उत्पादने भारतातच तयार केली जातील. सध्या देशात ३० ब्रँडेड ले आऊट आहेत ती २०० वर नेली जातील. देशात कंपनीची उत्पादने २५ हजार दुकानातून उपलब्ध आहेत. पुढच्या वर्षअखेर कर्मचार्‍यांची संख्या १७५०० वर नेली जाणार असून त्यात १५ हजार सेल्समन असतील. सध्या कंपनीचे ६ हजार सेल्समन आहेत. स्टोअर्सची संख्या २५० वर तर ३५० विशिष्ठ सेवा सेंटरही वर्षअखेरपर्यंत कार्यरत केली जाणार आहेत. चालू अर्थवर्षात कंपनीने ३६०० कोटी रूपयांच्या उलाढालीचे लक्ष्य ठेवले आहे.

Leave a Comment