
‘कोबाल्ट ५.५ एफ युवा’ हा स्मार्टफोन प्रयोगशील आणि अतिप्रगत तंत्रज्ञानाने युक्त उत्पादनांकरिता ओळखला जाणा-या आयबॉलने दाखल केला आहे. तरुणाईकरिता हा स्मार्टफोन खास डिझाईन करण्यात आला आहे. याची किंमत ८,९९९ रु एवढी आहे.
दाखल झाला आयबॉलचा ‘कोनाल्ट ५.५ एफ युवा’
कसा आहे कोनाल्ट ५.५ एफ युवा – २.५ डी कव्हर्ड ग्लास, ५.५ इंची एचडी डिस्प्ले, अँड्रॉईड लॉलिपॉप ५.१, २ जीबी रॅम आणि १ गिगाहर्ट्झ क्वाड कोअर कॉटेक्स ए ५३ ऍडव्हान्स्ड ६४ बिट प्रोसेसर, १६ जीबीची इंटर्नल मेमरी आणि ३२ जीबीपर्यंतची एक्स्पांडेबल मेमरी, एलईडी फ्लॅशने युक्त १३ एमपी रिअर कॅमेरा आणि ८ एमपी फ्रण्ट कॅमेरा, २६०० एमएएच बॅटरी, वाय-फाय सपोर्ट, ब्ल्यूटूथ टेदरींग, युएसबी, यूएसबी, इंटरनेट, ओटीजी १५० एमबीपीएस डाऊनलिंक आणि ५० एमबीपीएस डाऊनलिंक, व्हिडीओ आय कंट्रोल आय रेकग्निशन या क्रांतीकारी तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.
