जनधन योजनेत २१ कोटी खाती

jandhan
नवी दिल्ली – प्रधानमंत्री जनधन योजना हि जगातील सर्वात यशस्वी आर्थिक योजना असून २१ कोटी खाती या योजने अंतर्गत खोलण्यात आली आहेत. त्यामध्ये ३२,००० कोटी रुपये जमा करण्यात आल्याची माहिती राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिली आहे.

विविध सामाजिक सुरक्षा योजनांसह सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती भक्कम करण्यासाठी सरकारने पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार योग्य दिशेने प्रयत्न करताना दिसत आहे. विदेशामध्ये असलेला काळा पैसा आणि त्यावर निर्बंध घालण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत, त्याचा परिणाम दिसत आहे.

सरकारने खाद्य सुरक्षा, सर्वाना घरे आणि अनुदान यावर मोठय़ा प्रमाणावर लक्ष केंद्रित केले आहे. जनधन योजना केवळ बँक खाते उघडण्यापुरती मर्यादित राहिली नसून, मूलभूत आर्थिक सेवा गरिबांना उपलब्ध करण्यासाठी महत्त्वाचे साधन बनले आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजने अंतर्गत आतापर्यंत २.६ कोटी उद्योजकांना एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे. यामध्ये २.०७ कोटी महिला उद्योजिका आहेत.

Leave a Comment