वजन किती घटवावे?

weight
काही वजनदार लोक वजन घटवायला लागतात परंतु त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेत नाहीत. आपल्या मनाला येईल त्या मार्गाने वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात. काही लोक महिनाभरात १० किलो वजन घटवल्याचा दावा करतात तर काही लोक ३ महिन्यात १५ किलो किंवा २० किलो वजन कमी केल्याचे सांगतात. मात्र वजन नेमके कशासाठी कमी करायचे आहे आणि ते किती कमी केले पाहिजे याची पुरेशी माहिती त्यांना नसते. अमेरिकेतल्या काही तज्ञांनी याबाबत काही तारतम्याच्या सूचना दिल्या आहेत. वॉशिंग्टन येथील सेंट लुईस विद्यापीठातील सॅम्युअल क्लिन यांनी वजना संदर्भात काही सूचना केल्या आहेत.

एखाद्या माणसाचे वजन वाढून त्याला मधुमेहासारखा विकार जडतो त्यावेळी वजन घटवण्याची आवश्यकता निर्माण होते. तेव्हा त्या व्यक्तीच्या बाबतीत मधुमेह नियंत्रणात राहण्यापुरते वजन घटवणे आवश्यक ठरते. अशा लोकांनी महिन्यात १० किलो वजन कमी केले किंवा १५ किलो घटवले याला महत्त्व न देता आपल्या एकूण वजनाच्या ५ टक्के वजन कमी केले तरी त्याच्या इन्शुलीन लेव्हलमध्ये फरक पडू शकतो. त्याच पध्दतीने ज्या व्यक्तीला हृदयविकार होऊ नये म्हणून वजन कमी करायचे असते त्यांनीही वजनात मोठी घट आणण्याचा प्रयत्न करू नये. ५ टक्के घट ही त्यांच्यासाठी पुरेशी आहे.

डॉ. सॅम्युअल क्लिन यांनी ४० लठ्ठ लोकांवर प्रयोग केले. त्यांना कमी उष्मांकाचे अन्न खाण्याचे बंधन घालून त्यांचे वजन ५ टक्क्यांपर्यंत कमी केले आणि त्यांच्या तब्येतची तपासणी केली. तेव्हा असे आढळले की ५ टक्के वजन कमी केलेल्या १९ जणांच्या प्रकृतीमध्ये लक्षणीय बदल झाला. त्यापेक्षा अधिक वजन कमी केलेल्या ९ जणांच्या आरोग्याच्या आणखी काही तक्रारी कमी झालेल्या दिसल्या. परंतु फार वजन घटवले म्हणून खूपच प्रकृती सुधारली असे काही कोणाच्या बाबतीत आढळले नाही तेव्हा प्रकृती सुधारावी म्हणून वजन घटवण्याचा अतिरेक करण्याची गरज नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment