भारतातील पहिली स्मार्ट स्कूटर लाँच

e-sooter
बंगळुरु – भारतीय बनावटीची पहिली स्मार्ट ईलेक्ट्रिक स्कूटर बंगळुरु शहरातील ‘आथर एनर्जी’ या स्टार्टअप कंपनीने लाँच केली असून आथर ई-स्कुटर एस ३४० असे या स्मार्ट स्कूटरला नाव देण्यात आले आहे.

या प्रोजेक्टची सुरुवात मद्रास आयआयटीमध्ये करण्यात आली होती. ही गाडी तीन वर्षांच्या रिसर्चनंतर तयार करण्यात आली आहे. बंगळुरूमधील स्टार्टअप इव्हेंटमध्ये ‘एस ३४०’ ही स्मार्ट स्कूटर लाँच करण्यात आली आहे. ही संपुर्णपणे ‘मेक इन इंडिया’ ई स्मार्ट स्कूटर आहे.

विजेवर चालणारी ‘एस ३४०’ ही स्मार्ट स्कूटर आहे. यामध्ये अत्याधुनिक डिजीटल टचस्क्रीन डिस्प्ले दिलेला आहे. यात गाडी चालक स्वत:चे पर्सनलाईज्ड प्रोफाईल तयार करण्याची सुविधा आहे. जीपीएस नेव्हिगेशनच्या सुविधेमुळे गाडी चालक हवा असलेला मार्ग सेट करु शकतो. यासोबत आपल्याला हवे असलेले ठिकाण किती दूर आहे यासंदर्भातीलही माहिती या डिस्प्लेवर मिळणार आहे. या गाडीच्या बॅटरीला एक तासापेक्षाही कमी वेळेत चार्ज करता येईल.

‘आथर ई-स्कुटर एस ३४०’ या स्कूटचे डिझाइन पासून बनविण्याचे संपुर्ण काम भारतातच करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया कॅम्पेनमुळे संपुर्ण भारतीय बनावटीच्या या स्कूटरला आणखीन लोकप्रियता मिळण्याची शक्यता आहे. ही स्कूटर २५-४० किलो मीटर प्रती तास या स्पीडने चालवली जावू शकते. तर हाय स्पीडमध्ये ही स्कूटर ७५ किलो मीटर प्रती तास इतका स्पीड घेऊ शकते.

Leave a Comment