बहुप्रतीक्षित शिओमी ‘एमआय ५’ बाजारपेठेत

Xiomi-2
नवी दिल्ली: मोबाईल शौकीन ज्याची आतुरतेने वाट पहात आहेत; तो शिओमीचा नवा फ्लॅगशिप मोबाइल ‘एमआय ५’ चे बीजिंग आणि बार्सिलोना या ठिकाणी शानदार समारंभात लाँचिंग करण्यात आले.
‘एमआय ५’ हा शिओमी या चिनी कंपनीचा बहुप्रतीक्षित फोन आहे.

सोनेरी, काळा, पांढरा आणि गुलाबी या रंगात हा फोन उपलब्ध असणार आहे. स्नॅपड्रॅगन ८२० एसओसी प्रोसेसर, ४ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोअरेज, ३ हजार एमएएच बॅटरी, १६ मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि १३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा यासह ‘३ डी सिरेमिक बॉडी ही या फोनची वैशिष्ट्ये असणार आहेत.

सुमारे १८ हजार रुपये किंमत असलेला हा फोन लिनोव्हो आणि मायक्रोमॅक्सच्या फ्लॅगशिप मोबाइलला टक्कर देईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. वर्षभरात शिओमीचे भारतात ८ ते १० कोटी मोबाइल विक्रीचे लक्ष्य आहे.

Leave a Comment