कचरा कचराकुंडीत टाकून मिळवा फ्री वाय-फाय

think-scream
मुंबई : रस्त्यात कचरा फेकणाऱ्या भारतीयांची नेहमीच चर्चा होते. यासाठी पंतप्रधानांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानाची सुरुवात केली खरी, पण त्याने किती बदल घडवला हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पण, आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कोणाला बक्षीस दिले तर? किती मजा येईल ना! पण आता असे घडणार आहे. आपला कचरा आता कचराकुंडीत टाकल्यास वायफाय वापरायला मिळणार आहे.

एका अशा कचराकुंडीची निर्मिती मुंबईतील दोन व्यापाऱ्यांनी केली आहे ज्यात कचरा टाकल्यावर लोकांना वायफाय वापरण्यास मिळणार आहे. ही प्लास्टिकची कचराकुंडी ‘थिंकस्क्रीम’ कंपनीचे मालक राज देसाई आणि प्रतीक अग्रवाल यांनी तयार केली आहे.

या कचराकुंडीत कचरा फेकल्यावर स्क्रीनवर एक कोड येईल. हा कोड आपल्या मोबाईलवर टाकल्यावर लोकांना १५ मिनिटांसाठी वाय-फाय इंटरनेट वापरता येईल. कचराकुंडीपासून ५० मीटरच्या परिसरात ही सुविधा वापरता येईल. यासाठीच एका मुंबईच्या एका टेलिकॉम कंपनीसोबत करण्यात आला करण्यात आली आहे. यातील प्रत्येक कचराकुंडीची किंमत एक लाख रुपयांच्या घरात आहे. मुंबईतील काही चित्रपट थिएटरमध्ये अशा प्रकारच्या काही कचराकुंड्या लावण्यात आल्या आहेत.

Leave a Comment