व्हर्च्युअल शुभेच्छांना लाईव्ह टच देणार फेसबुकचे नवे फीचर

facebook
मुंबई : अनेक विसराळूंना आपल्या मित्रमैत्रिणींना वाढदिवसाच्या शुभेच्छा फेसबुकच्या रिमाइंडरमुळे देता येतात. आपले जुने फोटो, कोलाज, आठवणी जागवून अनेक जण फेसबुकवर व्हर्च्युअल सेलिब्रेशन करतात. मात्र आता या शुभेच्छांना एक लाईव्ह टच देता येणार आहे.

आता तुमच्या मित्राच्या बर्थडेला तुम्ही १५ सेकंदांचा व्हिडिओ पाठवून देखील शुभेच्छा देऊ शकाल. या नव्या फीचरबाबत फेसबुककडून घोषणा करण्यात आली. मित्राच्या टाईमलाईनवर हा व्हिडिओ शेअर करुन तुम्ही प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही मित्राला खुश करु शकाल. सोमवारपासून हे नवे फीचर iOS डिव्हायसेसवर रोलआऊट व्हायला सुरुवात झाली आहे. अँड्रॉईड यूझर्सना मात्र यासाठी काही महिने वाट पाहावी लागणार आहे. वाढदिवस शुभेच्छा ध्यानात ठेवूनच हे फीचर तयार करण्यात आले आहे. यावर अनेक बर्थडे थीम्स आणि फ्रेम्सचाही ऑप्शन असेल.

व्हिडिओ शेअर करण्याकरिता काय कराल ?
आपल्या मित्राच्या प्रोफाईलवर iOS डिव्हाईसवर फेसबुक अॅपवरुन जा. व्हिडिओ प्रॉम्प्ट हा बॅनर सिलेक्ट करुन व्हिडिओची थीम निवडा. रेकॉर्ड व्हिडिओवर प्रेस करुन व्हिडिओ तयार करा. फेसबुकवर शेअरिंगसाठी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करुन मित्रांच्या वॉलवर व्हिडिओ शेअर करा.

Leave a Comment