
नवी दिल्ली – उन्हाळी हंगामापुर्वी ग्राहकांना विमान वाहतूक सेवा कंपनी स्पाइसजेटने विशेष सवलत जाहीर करीत ५९९ रुपयांपासून विमान तिकीटे देण्याची घोषणा केली असून नॉन-स्टॉप उड्डाणे करणाऱ्या विमानांच्या एकतर्फी प्रवासासाठी ही सवलत लागू होणार आहे.
स्पाइसजेट घडवणार अवघ्या ५९९ रुपयांत हवाईसफर
२५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपर्यंत आजपासून सुरु झालेली तीन दिवसांची विशेष सवलत योजना सुरु राहणार आहे. प्रवाशांना १ मार्च, २०१६ ते १३ एप्रिल २०१६ दरम्यानच्या प्रवासासाठी तिकीटे आरक्षित करता येणार आहेत. ही सवलत कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करण्याला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी योजना उपयोगी ठरेल. तसेच प्रतिकूल हवामान परिस्थितीत प्रवास टाळणाऱ्या प्रवाशांसाठीदेखील मार्च एप्रिलचा वसंत ऋतू अनुकूल ठरेल, असे स्पाइसजेटच्या व्यावसायिक विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष शिल्पा भाटिया यांनी सांगितले.
