अॅपलचा नवा आयफोन ए नाईन चिपसह येणार

iphone
अॅपल ने ए नाईन व ए नाईन एक्स प्रोसेसरसह नवा आयफोन व आयपॅड मार्च महिन्यात लाँच करण्याची तयारी केली असून ही डिव्हायसेस लाँच करण्यासाठी एक इव्हेंटही आयोजित केला आहे. यात अपडेटेड आयपॅड व लहान स्क्रीनचा आयफोन यांचा समावेश आहे. ही दोन्ही डिव्हायसेस लेटेस्ट एईक्स व ए नाईन चिपसह येतील.

छोटा आयफोन फाईव्ह एसई या नावाने बाजारात येत आहे. याचे डिझाईन २०१३ साली लाँच केलेल्या फाईव्ह एस प्रमाणेच आहे. त्याला ४ इंची स्क्रीन, ८एमपीचा रियर तर ५ एमपीचा फ्रंट शूटर कॅमेरा दिला गेला आहे. आयपॅड चे डिझाईन आयपॅड प्रो प्रमाणेच असून त्याला चार स्पिकर सिस्टीम दिली गेली आहे.