
नवी दिल्ली- शुक्रवारी सकाळी पुन्हा जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फ्रीडम २५१ची प्री-बुकींग सुरु झाली. गुरुवारी कंपनीची वेबसाइट क्रॅश झाली होती. मात्र, फोनची बुकींग करताना अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याचे ‘ट्विटर’वर यूजर्सनी म्हटले आहे.
२५१ची प्री-बुकिंग पुन्हा सुरु
रिंगिंग बेल्स कंपनीचा २५१ रुपये किमतीचा फोन ग्राहकांना शिपिंग चार्जेससह २९१ रुपयांत मिळणार आहे. पहिल्या दिवशी कंपनीला ३० हजार हॅंडसेट्सची ऑर्डर मिळाली. त्यातून कंपनी ८७ लाख रुपये मिळवले आहे. दुसरीकडे, फोनच्या किमतीवरून सरकारने कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले आहे. उत्तर प्रदेश सरकार या प्रकरणी चौकशी करत आहे. दरम्यान, सर्वात स्वस्त स्मार्टफोनला देशातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
