चीनमधील महिलांना ‘त्या’ काळात मिळणार रजा

chin
बीजिंग : चीनच्या एका प्रांतात नोकरदार महिलांना मासिक पाळीच्या दिवसांत रजा देण्यासाठी सहमती दर्शविण्यात आली असून पण त्यासाठी त्या महिलेला डॉक्टरचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे.

नोकरदार महिलांना मासिक पाळी आल्यास किंवा मासिक पाळीमुळे त्रास होत असल्यास त्यांना तो निमूटपणे सहन करावा लागतो. दर महिन्याला महिलांना होणाऱ्या या त्रासातून दिलासा मिळावा यासाठी रजा देण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबतची माहिती चीनमधील एका वेबसाईटने दिली असून महिलांना अशा प्रकारे रजा देणारा हा पहिला प्रांत नाही, तर यापूर्वीही काही प्रांतांत अशी सुविधा देण्यात आलेली आहे. दरम्यान, एका सर्व्हेनुसार याचा दैनंदिन कामकाजावर परिणाम होईल, म्हणून २० टक्के महिलांनी या सुटीवर असहमती दर्शविली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment